खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बायगाव खुर्द येथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत ‘अंगण का मिलाप’ उपक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील बायगाव खुर्द येथील अंगणवाडी केंद्रात २ ऑक्टोबर रोजी ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत ‘अंगण का मिलाप’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. सविताताई पाटील, सरपंच सौ. प्रतीक्षा गणेश नागरे, भाजप कार्यकर्ते गणेश नागरे, देऊळगाव राजा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा बोरकर, किसान मोर्चा आघाडीचे गणेश पालवे, तसेच प्रकाश गाढवे, शिवानंद मांटे, राजू जाधव, मांटे मॅडम, पुष्पा मॅडम, बीबी येथील मॅडम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी बालगोपालांचीही उपस्थिती होती.

‘अंगण का मिलाप’ उपक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, पोषणविषयक उपक्रम आणि बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत यावेळी माहिती घेण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी केंद्रातील उपक्रमांची पाहणी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button