Uncategorized

कल्याण मध्ये एका गुंतवणूकदाराची तीस लाखाची फसवणूक..

कल्याण मध्ये एका गुंतवणूकदाराची तीस लाखाची फसवणूक…… स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर विशांत विश्वास भोईर, पूजा विशांत भोईर (रा. श्री गणेश माधव सोसायटी, खडकपाडा, कल्याण) अशी फसवणूक करणाऱ्या संचालकांची नावे आहेत. भोईर दाम्पत्याची मे. साई ॲड्व्हायझरी ॲन्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. पोलिसांनी सांगितले, आरोपी विशांत आणि पूजा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तक्रारदार सौरभ गणात्रा (३९, रा. सुंदरनगर, बेतुरकरपाडा) आणि यशश्री साळुंखे यांना आपण शेअर व्यवसायात काम करतो. आमच्या गुंतवणूक कंपनीत आपण पैसे गुंतविले तर आपणास १० टक्के परतावा मिळेल असे वाढीव नफ्याचे आमिष दाखविले. वाढीव नफा मिळतो म्हणून बांधकाम व्यावसायिक सौरभ यांनी २५ लाख, आणि यशश्री यांनी पाच लाख रुपये भोईर यांच्या मे. साई इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतविले. वर्ष होत आले तरी आपणास व्याज मिळत नसल्याने तक्रारदाराने मूळ रक्कम परत करण्यास भोईर यांच्याकडे मागणी केली. ती रक्कम देण्यास ते टाळाटाळ करू लागले. भोईर आपली फसवणूक करत आहे ते लक्षात आल्यावर सौरव गणात्रा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button