बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मुंबईतील १ जूनच्या भव्य मोर्चासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक ताईंना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

बुलढाणा:- ३१ मे २०२६
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर्स व गटप्रवर्तक ताईंना नम्र आवाहन करण्यात येत आहे की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या न्याय्य व महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे १ जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
किमान वेतन ३० हजार रुपये, समान कामाला समान वेतन, कर्मचाऱ्यांचा दर्जा, पेन्शन, ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, भरपगारी आजारी रजा, सामाजिक सुरक्षा तसेच आशा वर्कर्सवर लादण्यात येणाऱ्या अतिरिक्त नियमबाह्य ऑनलाइन कामांच्या विरोधात हा मोर्चा निघणार आहे.
या आंदोलनाची तयारी जिल्हाभरात अनेक दिवसांपासून सुरू असून मोठ्या संख्येने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक ताई सहभागी होणार आहेत. काही अपवादात्मक परिस्थिती वगळता सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक ताईंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या एकजुटीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे. शासनापर्यंत आपल्या मागण्या ठामपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येक ताईची उपस्थिती गरजेची आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने, जोशात आणि शिस्तबद्ध पद्धतीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.आपले हक्क, आपले अस्तित्व आणि उज्ज्वल भविष्य यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. ही लढाई प्रत्येकाची असून “आता नाही तर कधीच नाही” ही भावना मनात ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
मोर्चासाठी येताना दोन दिवसांचा जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, उन्हापासून बचावासाठी रुमाल/स्टोल सोबत आणण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
“आम्ही येतोय… तुम्हीही या…!
लढेंगे – जितेंगे…!
सीटू जिंदाबाद…!”….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button