महाराष्ट्र

ओबीसी आरक्षण ला धक्का लागल्यासओबीसी संघर्ष समितीचा उपोषणाचा इशारा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – ओबीसी हा भारतातील एक मागास प्रवर्ग आहे ज्याला इतर मागास वर्ग किंवा ओबीसी असे म्हटले जाते. या प्रवर्गामध्ये अनेक जातींचा समावेश होतो.हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग आहे.मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या 360,तर देशात ओबीसी जातींची संख्या 3744 इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने 2171 प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.ओबीसी समाजात वंजारी,माळी,तेली,धनगर आदी जातींचा समावेश होतो.शासनाने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडुन जर त्यांचा समावेश ओबीसी मध्ये केला तर मुळ ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळु शकणार नाही.त्यामुळे मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात येवु नये आवश्यक्ता असल्यास त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या याबाबत निवेदन आज दी 20 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधकारी विश्वनाथ घुगे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना अजयसिंह राजुरकर ,
दिपक बुधवंत,गणेश राऊत,सोहन बळी,अजिंक्य मेडशीकर व ईतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button