बुलढाणामहाराष्ट्र

एकलारा-बानोदा परिसरात विजेचा कडकडाट; गणेश भातखडे यांच्या शेताजवळील टॉवरवर वीज कोसळली, मोठी जीवितहानी टळली….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २७ जून २०२६
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा-बानोदा परिसरात आज दि. 27 जून सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वातावरणात आणि विजांच्या कडकडाटात एक धक्कादायक घटना घडली. एकलारा बानोदा येथील शेतकरी गणेश भातखडे यांच्या शेतातील टॉवरवर वीज कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भातखडे यांच्या शेतात पेरणीचे काम सुरू होते. त्यावेळी शेतामध्ये सुमारे पाच ते सहा मजूर आणि शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त होते. अचानक हवामानात बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला आणि शेतातील कामगारांपासून अवघ्या शंभर फूट अंतरावर असलेल्या टॉवरवर जोरदार वीज कोसळली. वीज पडताच मोठा आवाज झाला आणि काही क्षणांसाठी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या वेळी शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली. वीज थेट टॉवरवर कोसळल्यामुळे शेतातील कामगार आणि शेतकरी थोडक्यात बचावले. या घटनेमुळे उपस्थित सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पावसाळ्यात शेतीची कामे सुरू असताना विजेच्या धोक्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पावसाळ्याच्या काळात शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन केले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने एकलारा-बानोदा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button