खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गालगत सापडलेल्या अनोळखी मृताची ओळख पटवा; माहिती असल्यास मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर, दि. २५ : मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत धोडगाव शिवारातील हॉटेल निसर्गजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद (अ.म. नं. ३६/२०२६) करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून रंग सावळा आहे. डोक्यावर तसेच दाढीचे केस वाढलेले असून अंगात पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेली होती.या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, संबंधिताची माहिती किंवा नातेवाईकांची माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच नागरिकांनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून मृताची ओळख पटविण्यास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button