गुन्हेगारीजळगावा जिल्हा

एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय तरुणीचा खून

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी प्रमोद सोनवण|

३० जुलै २०२४राज्यातील अनेक शहरात खुनासह मारहाणीच्या घटना सातत्याने वाढत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून चाकूने गळ्यावर आणि पोटावर वार करत तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना म्हाळुंगे एमआयडीसीतील आंबेठाण येथे घडली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठलाग करून आरोपी तरुणाला कराड (जि. सातारा) येथे बेड्या ठोकल्या.सविस्तर वृत्त असे कि, प्राची विजय माने (वय 21, रा. आंबेठाण, खेड, मूळ – इस्लामपूर, वाळवा) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, अविराज रामचंद्र खरात (रा. बहे, ता. वाळवा) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराज याने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून प्राचीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्राचीचा मोबाईलही सोबत घेऊन तो पसार झाला होता.तो दुचाकीवरून सातारा-कराड रोडवरून जात असल्याची माहिती रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांना पाहताच तो जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाईलसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button