
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा.दि ३० ; तेल्हारा तालुक्यातील उबाठा गटाचे निष्ठावान उप.तालुकाप्रमुख देवानंद पिंटू पाटील फोकमारे यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या शिवसेनेत आज जाहिर प्रवेश घेतला असुन या शिवसैनिकांनी जणु शिवसेना संघटन वाढविण्यासाठी निश्चय केलेला आहे असे दिसुन येत आहे.
अकोला जिल्हा संपर्कप्रमुख प्रमुख उपनेते मा . आमदार गोपीकिशन बाजोरीया, जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव यांच्या नेतृत्वात
तेल्हारा तालुक्यातील उबाठा गटाचे उप.तालुकाप्रमुख देवानंद (पिंटू पाटील) फोकमारे यांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश अकोल्यातील शिवसेना जन संपर्क कार्यालयामध्ये करण्यात आला यांची तेल्हारा तालुका निवासी उप.तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली असुन त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिले.



