महाराष्ट्रमुक्ताईनगर

उभ्या ट्रकला आयशरची धडक : एक ठार…

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील घटना

मुक्ताईनगर — मुक्ताईनगर ते पिंपरीआकाराऊत दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या असलेल्या ट्रक ला आयशरने धडक दिल्याने एक तरुण ठार झाल्याची घटना तेरा रोजी रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी घडली.
याबाबत खरगोन जिल्ह्यातील बडवाह तालुक्यातील पिंपरीखेडा येथील शिवम इंदरसिंग कनासे हेल्पर याने मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मुक्ताईनगर ते पिंपरीआकाराऊत दरम्यान एम पी 09 एच एच 64 43 हा ट्रक नादुरुस्त झाल्याने त्या ठिकाणी उभा होता आणि सदर ट्रकचे दुरुस्तीचे काम सुरू होते अशाच ट्रकला मागून आयशर गाडीने जोरदार धडक दिली सदर आयशर गाडीचा क्रमांक जी जे 03 बी वाय 18 87 असा असून यात बदाम सिंग हरिनामसिंग चव्हाण वय 34 वर्षे हा इसम ठार झाला त्यामुळे आयशर क्रमांक जी जे बी वाय 18 87 वरील चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पीएसआय संदीप चेढी हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button