जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर दाखल; विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी


शैक्षणिक वर्षाच्या तयारीला वेग : पहिली ते आठवीसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण नियोजन पूर्ण

मुक्ताईनगर : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा साठा तालुकास्तरावर प्राप्त झाला असून शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्याचे शासनाचे नियोजन असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यामध्ये इयत्ता तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावीच्या काही विषयांव्यतिरिक्त बहुतांश सर्व पाठ्यपुस्तके तालुक्यात दाखल झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत वेळेत पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे.

माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. वसंतराव मोरे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कोंघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तके ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी समन्वयक श्री. डी. जे. पाटील, सहसमन्वयक श्री. महेंद्र मालवेकर, केंद्रप्रमुख श्री. संजय ठोसर, श्री. ईरफान तडवी, रोखपाल श्री. मधुकर सैतवाल, विषयतज्ञ श्री. योगेश भोसले तसेच विशेष शिक्षक श्री. नितिन झोपे उपस्थित होते.

शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार असल्याने पालक व शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button