बुलढाणा

हरवलेला मुलगा सुखरूप घरी परतला

हरवलेला मुलगा सुखरूप घरी परतला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव | येथील जमजम नगर येथील मदरशातून १७ वर्षीय शे. बदोद्दिन शे. सलीम हा अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मुलाची आई अल्मास बानो शेख सलीम ( ३७ ) रा. अस्पाकउल्लाह चौक शेगाव यांनी १६ ऑगस्ट रोजी शेगाव शहर पो.स्टे. ला दिली होती.तर १९ ऑगस्ट रोजी चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथून फिर्यादीच्या नातेवाईकांचा त्यांना कॉल आला व बेपत्ता मुलगा शे. बदोद्दिन शे. सलीम हा त्यांच्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. मुलाची आई ताबडतोब चांदुर बिस्वा येथे पोहोचली व मुलाला शेगावी सोबत घेऊन आली. बेपत्ता मुलगा घरी सुखरूप पोहचल्याने मुलाच्या आईसह नातेवाईक व शेजारीपाजाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button