बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा संग्रामपूर वकील संघातर्फे भव्य सत्कार!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 

प्रतिनिधी संग्रामपूर.

रतन भगत. 


 सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर येथे न्यायालयीन जागेच्या भूसंपादन नापासुन ते शासनाकडून बांधकामाकरिता निधी मिळून या ठिकाणी भव्य दिव्य न्यायालयीन इमारत उभी करण्यासाठी सतत प्रयत्न करून न्यायाधीश निवास व न्यायालयीन भव्य इमारत बांधकामा करिता भरगोस निधी उपलब्ध करून दिला.या निधीअंतर्गत न्यायाधीश निवास स्थानांचे पूर्ण बांधकाम झाले असून न्यायालयीन भव्य इमारतीचे बांधकाम सध्या स्थितीत अंतिम टप्प्यात पर्यंत पोहोचले आहे. याच कारणामुळे वकील संघाकडून लोकनेते माजी  मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .संग्रामपूर येथे दिवाणी वरिष्ठ न्यायालय व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापन व्हावा याकरिता मागणी करण्यात आली. तसेच चर्चेच्या दरम्यान आमदार कुटे यांनी सांगितले की वकील संघाला सर्वतोपरी माझ्याकडून सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले .यावेळी वकील संघाचे अध्यक्ष कीर्तने साहेब, एडवोकेट क्षीरसागर साहेब, एडवोकेट पि.के .घाटे साहेब ,एडवोकेट वानखडे साहेब, एडवोकेट बावस्कर साहेब एडवोकेट राऊत साहेब , एडवोकेट तायडे साहेबआधी वकील साहेब उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button