खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व व इंग्लिश एक्सटेम्परी स्पर्धा संपन्न :

जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व व इंग्लिश एक्सटेम्परी स्पर्धा संपन्न :

दिनांक 23 सप्टेंबर 2025

: अकोला:शिक्षणाधिकारी

माध्यमिक जि. प. अकोला, महाराष्ट्र इंग्लिश टीचर्स असोसिएशन आणि श्री शिवाजी विद्यालय टाऊन ब्रांच, हरिहर पेठ अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठीची जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आणि इंग्लिश एक्सटेम्परी स्पर्धा स्थानिक श्री शिवाजी विद्यालय टाऊन ब्रांच येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. मराठी व उर्दू माध्यमा करिता आधी ठरवून दिलेल्या विषयावर इंग्रजी भाषण स्पर्धा आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता पूर्वतयारी न करता वेळेवर दिलेल्या विषयावर भाषण स्पर्धा असे या उपक्रमाचे स्वरूप होते. इयत्ता सहा ते आठ चा गट अ आणि इयत्ता 9 व दहावीचा गट ब असे दोन गट होते. या आधीच्या तालुकास्तरीय फेरीतील प्रत्येक तालुक्यातील पहिल्या क्रमांकाचे विजयी स्पर्धक स्पर्धेला उपस्थित होते. कार्यक्रमा च्या उद्घाटन समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून वेतन पथक अधीक्षक अनिल कोल्हे, देशोन्नतीचे वार्ताहर प्रा प्रवीण ढोणे, इंग्रजी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डीबी म्हैसने, मुख्याध्यापक मनोज देशमुख, इंग्रजी शिक्षक संघटनेचे बळवंत गावंडे, महेंद्र कराळे लाभले होते. शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डीबी म्हैसने यांनी केले. स्पर्धेला परीक्षक म्हणून गोपाल दशमुखे, प्रबोधन विद्यालय दर्यापूरचे राजकुमार बावनकुळे, योगिता बयस, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कपिला म्हैसने होत्या. अनिल कोल्हे व प्रवीण ढोणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला इंग्रजी शिक्षक संघटनेचे अनंत मसने, विलास उमक, समाधान भालतिलक, सुरेंद्र भगत, गणेश राऊत, पंकज आमले, फरहत उल्ला खान, महेंद्र कराळे, बळीराम वानखेडे, पवन सोयाम, संतोष ताले, मोहम्मद सकलेन, सुनील अवचार व इंग्रजी शिक्षक बहुसंख्यत उपस्थित होते तसेच श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धकांची भाषणे प्रभावी व उत्स्फूर्त झाली. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अ गटात बाल शिवाजी शाळेचा अद्वैत गायकवाड प्रथम, भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट ची तनवी गुजर हिने द्वितीय, महात्मा गांधी विद्यालय हातरुण चा असित डोंगरे तृतीय क्रमांक, तर ब गटात सावित्रीबाई फुले विद्यालय बेलखेड ची आदिती वानखडे प्रथम, सय्यद मुजफ्फर हुसेन उर्दू हायस्कूल अकोटची सिफान अंजुम द्वितीय, श्री जगेश्वर विद्यालय वाडेगाव ची नंदिनी खरात तृतीय, इंग्लिश इंग्लिश एक्सटेम्परी स्पर्धेत अ गटात नॉएल इंग्लिश स्कूलची साची सुरवाडे प्रथम, विद्यांचल द स्कूल अकोटची आनंदी थारकर द्वितीय, जागेश्वर इंग्लिश कॉन्व्हेंट ची विधी सरप तृतीय, तर ब गटातून सेंट फॉल हायस्कूल हिवरखेडची आयुषी गावंडे प्रथम, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल पातूरची ऋतुजा राठोड द्वितीय, परमानंद मलानी इंग्लिश हायस्कूल मूर्तीजापुरची त्र्यंबकाक्षी भटकर तृतीय क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ह्याप्रसंगी फरीदा आली,महेंद्र कराळे, समाधान भालतिलक, कपिला म्हैसणे यांची समयोचित भाषणे झाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button