डिगांबर अशोक झुंजारे यांची मुंबई महापालिका येथे स्टेनोग्राफर पदी नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – वाशिम तालुक्यातील अडोळी या ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातून आलेल्या डीगाबर झुंजारे या तरुणाची स्टोनोग्राफर मुंबई महानगरपालिका येथे निवड झाली. या निवडीबद्दल डीगाबर झुंजारे यांचा अडोळी गांव करानी शाल व श्रीफळ देउन सत्कार केला ग्रामीण भागातील तरुणही प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात. ही बाब अडोळी येथील शेतकरी कुटुंबातील, घरी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना डीगंबर झुंजारे यांनी जिद्द करून दाखविली. त्यांची स्टोनोग्राफर मुंबई महानगरपालिका पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड मेहनतीने अभ्यास करून अपेक्षीत यश मिळवू शकतात. त्यामुळे डीगाबर झुंजारे सारखे युवक हे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असतात. ही बाब हेरून शेतकरी अडोळी गावकऱ्यांनी सत्कार केला.
शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन इढोळे. छत्रपती नैसर्गिक गट आडोळी अध्यक्ष भागवत पाटील व सचिव अमोल इढोळे यांनी हा सत्कार घडवून आणला.



