महाराष्ट्र

सोयाबीनच्या ऑनलाईन नोंदणीस तालुक्यात प्रारंभ

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र शासनाने सोयाबीनचे हमीभाव ४८९२ रुपये जाहीर केले असून हमीभावात सोयाबीन खरेदीसाठी शासकीय नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत खरेदी विक्री संस्थेकडे ३६० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती देताना तालुका खरेदी-विक्री संस्था अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी हमीभावात नोंदणी शेतकऱ्यांनी तातडीने करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. नाफेड मार्फत शासनाच्या सोयाबीन खरेदीच लवकर सुरुवात होत असताना या खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात झाली आहे केंद्र शासनाच्या सोयाबीनला हमीभाव ४८९२ रुपये असताना शासनाच्या हमीभावात शेतकऱ्यांचा सोयाबीन माल हा खरेदी केला जाणार असल्याने? सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार असून मालेगाव तालुका खरेदी विक्री संस्था कार्यालयात नोंदणी सुरुवात झाली आहे तर आतापर्यंत ३६० शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे गेल्या तीन- चार दिवसात नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा कल असल्याने मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हमीभावात विक्रीसाठी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन मालेगाव तालुका खरेदी विक्री संस्था अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी केले आहे हमीभाव नोंदणी बाबत प्रस्तुत प्रतिनिधीला अधिक माहिती देताना तालुका खरेदी विक्री कार्यालयात साडेदहा ते साडेपाच पर्यंत नोंदणी केल्या जाणार आहे नोंदणी करताना शेतकऱ्यांनी अत्यावश्यक असणारे कागदपत्र सोबत आणावे व नोंदणी करावी असेही त्यांनी सांगितले नोंदणी केल्यानंतर आदेशानुसार लवकरच मालाची खरेदी सुरू केल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच याप्रसंगी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते नोंदणी केलेले पत्र देण्यात आले यावेळी व्यवस्थापक अरुण इंगोले यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button