अवाढव्य वृक्ष कोसळला, सुदैवाने प्राणहानी टळलीसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष की ठेकेदाराचा हेकेखोरपणा ?

(हिवरखेड प्रतिनिधी महेंद्र कराळे )
आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान ऐन वाहतुकीच्या काळात हिवरखेड येथील सर्वात गजबजलेल्या स्व. संपतराव भोपळे चौकातील हिवरखेड अकोट रस्त्यावरील भोपळे कॉम्प्लेक्स मधील विनोद दही व मंगेश ताळे यांच्या हॉटेलच्या मधात असणारा शंभर वर्षे जुना अवाढव्य वृक्ष अचानक कोसळला. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. अकोट हिवरखेड राज्य महामार्गाचे काम सुरु असून शहरालगत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भल्या मोठया नाल्यांचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराने या नाल्यांच्या मधात येणारे हे अवाढव्य वृक्ष सुरुवातीलाच हटवणे जरुरी होते. भोपळे कॉम्प्लेक्सचे मालक शामशील भोपळे यांनी सुरुवातीलाच हा वृक्ष हटवण्याची वेळोवेळी विनंती केली होती.पण पाच सात फुट खोल नाली बांधकाम करत वृक्षांच्या सभोवती जेसीबी मशीनने खोदकाम केले. त्यामुळे या वृक्षाची मुळे कापली गेली व निराधार झालेला हा वृक्ष आज सकाळी अचानक कोसळला.जर या घटनेत प्राणहानी झाली असती तर ही घटना दुर्घटनेत बदलली असती. तरीही या भयंकर घटनेला व झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे. या घटनेत अनेक ऑटो, दुचाकी वाहने व हॉटेल मालकाच्या टेबल -खुर्च्याचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी नुकसान ग्रस्त लोकांची मागणी आहे. या एवढ्या मोठया झालेल्या घटनेला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष की ठेकेदाराचा हेकेखोरपणा असा प्रश्न जनतेला पडला आहे.
प्रतिक्रिया.
1)मी संबंधित काम पाहणाऱ्या जबाबदार व्यक्तींना वेळोवेळी याबाबत सावध केले होते व हा वृक्ष हटवण्याची मागणी केली होती पण माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शामशील भोपळे -नगरसेवक हिवरखेड, भोपळे कॉम्प्लेक्सचे मालक
2)हा वृक्ष कोसळल्याने माझे टेबल व खुर्च्या तुटल्या असून माझे हजारो रुपयांचे नुकसान झाले तरी मला नुकसान भरपाई देण्यात यावी.
विनोद दही हॉटेल मालक



