
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
नांदुरा : नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेला एका नागरिकाला पोलीस उपनिरीक्षकाने (पीएसआय ) बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली, अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत . संबंधित पोलीस उपनिरीक्षका विरुद्ध त्यांच्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे,
नांदुरा खुर्द येथील रहिवासी श्री.गोपाळ राधेश्याम नालट वय (३०) हे २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.३०वाजता वैयक्तिक तक्रार घेऊन नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये गेले होते, त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांच्याशी नालट यांचा वाद झाला , आरोपानुसार, पीएसआय घाटोळ यांनी नालट यांचा तक्रार अर्ज स्वीकारण्यास नकार देत तो अर्ज फेकून दिला .
दरम्यान या प्रकाराचा व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या पीएसआय घाटोळ यांनी नालट यांना चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप
तक्रारीत करण्यात आला आहे, या प्रकरणाची नांदुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११५ ( २ ) अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे , पोलीस उपनिरीक्षक घाटोळ हे सध्या नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणून कार्यरत असून. त्याच पोलीस ठाण्याच्या नोंदवाहीत आता त्यांची नोंद’आरोपी “म्हणून झाली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,



