बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अनुराधा अर्बन बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात….

कर्मयोगी तात्यासाहेबांनी लावलेल्या वृक्षाचे राहुलभाऊंनी महावृक्षात रूपांतर केले : राजेंद्र शिंगणे

चिखली : सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राने मोठे योगदान दिले आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत विविध संस्था सर्वसामान्यांच्या प्रगतीला हातभार लावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अनुराधा अर्बन बँकेचे रोपटे काही वर्षांपूर्वी आदरणीय तात्यासाहेबांनी लावले. त्यांनी या रोपट्याची जोपासना करून त्याचे वृक्षात रूपांतर केले. तर शून्य टक्के थकीत, शंभर टक्के विश्वास हे ब्रीद घेऊन राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने केलेली प्रगती पाहताना सहकार क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून मला मनापासून आनंद आहे, एकंदरीत तात्यासाहेबांनंतर राहुलजी बोंद्रे यांनी या वृक्षाचे महावृक्षात रूपांतर केले,असे गौरवोद्गार माजी मंत्री, सहकार नेते तथा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणे यांनी काढले.

रविवार 27 सप्टेंबर रोजी श्री. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था चिखली येथे अनुराधा अर्बन बँकेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी राजेंद्र शिंगणे बोलत होते. याप्रसंगी  विचारपीठावर आमदार धीरज लिंगाडे, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गरोळे, विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, रामभाउ जाधव, डाॅ. मोहमंद इसरार, रिजवान सौदागर, पप्पुसेठ हरलालका, एकनाथराव थुट्टे, प्रभुकाका बाहेकर, पांडुरंग पाटील भुतेकर, ईष्वरराव इंगळे, काषिनाथअप्पा बोंद्रे, दिपकभाउ देषमाने, नंदुकिशोर शिदे, आबांदासभाउ बाठे, प्रकाष निकाळजे, प्रा. निलेश गावंडे, अषोकराव पडघान, ज्ञानेष्वर सुरूशे, डाॅ. सतोष वानखेडे, पंडीतराव चाटे, प्रभाकर वाघ, रामभाउ खेडेकर, पाडुरंगभाउ तायडे, मदनराजे गायकवाड, श्रीकिसन धोंडे, बाळु पवार, नंदु क-हाडे, पुरूषोत्तम तात्या हेलगे, सचिन बोंद्रे, राजीव जावळे, कुणाल बोंद्रे, सिध्देष्वर परीहार, दिपक म्हस्के, मनोज लाहुडकर, संजय गवई, गजानन वायाळ, गोपाल देव्हडे, जक्काभाई, संतोष वाकडे, दिपक हाके, श्रीराम झोरे, आनंद बोंद्रे, प्रदिप हाके, बाजीराव पाटील, हेमंत शिसोदीया, किषोर आराख, तुळशिराम काळे, गोकुळ शिंगणे, रामधन मोरे, संतोष देषमुख, जगन्नाथ पाटील, यांची उपस्थिती होती.सभेची सुरुवात सदगुरु मौनी बाबा यांच्या समाधीला अभिवादन करुन झाली.सभेचे प्रास्ताविक बँकचे उपाध्यक्ष डॉ विश्वनाथ यादव यांनी केले. बँकेचा आर्थिक अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके यांनी सादर केला. यावेळी सभेपुढील १२ विषयांना संमती देण्यात आली. दरम्यान तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी राहुल भाऊ बोंद्रे यांच्या राजकीय,सामाजिक, सहकार क्षेत्रातील कार्यावर प्रकाश टाकत राहुल भाऊंच्या पाठीशी चिखली तालुका पूर्ण शक्तीनिशी पाठीशी असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज दांडगे यांनी राहुल भाऊ बोंद्रे यांनी बँकेच्या माध्यमातून आम्हाला कायम मदत केल्याचे सांगितले. सभेचे सूत्रसंचालन प्रा.उन्मेश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन पी.एस. वायळ यांनी केले.
याप्रसंगी प्रदिप देषमुख मेहकर, आंबादास वाघमारे, दिलीप पाटील, विजु पाटील, शेजोळ, विजय राउत, लक्ष्मणराव कुळकर्णी, विजुभाउ जागृत, प्रकाष चव्हाण, सदुनाना ठेंग, रामदास तायडे, रामदास मोरे, डाॅ. अमोल लहाने, बिदुसिंग इंगळे, हाजी राउफ भाई, शेषराव आंभोरे, गणेष जंवजाळ, विष्णु फेफाळे, किषोर साखरे, जगन्नाथ उबरकर, समाधान पायघन, अंबादास खरात, गजानन लांडे पाटील, सरपंच दिपक केदार, मधु पाटील, फुलसिंग पाटील, श्रीमती प्रमिलाताई जाधव, शालीताई वानखेडे, अनिताताई घुगे, विद्याताई देषमाने, सौ.षिसोदीया, मुरलीधर क्षिरसागर, रामभाउ भुसारी, समाधान आकाळ, टिपा महाराज, कडु लाला, विजु गिते, विष्णु कोरडे, शफिक भाई, सदुनान ठेंग, मोतीसिंग लवंगे, सोनडोमळे सर, भगवान खरात, गजानन वांजोळ, दत्ता करवंदे, दत्ता मोरे, षिवदास मोरे, अरून शेळके, नंदु पाटील, गुलाब भाई, ताहेर भाई, अषोकराव वानखेडे, सुरेष जाधव, गजानन गायकवाड, गोकुळसिंग पवार, मलीक भाई, अषोक पडघान एलआयसी, अषोक झगरे, विठल सोनुने, भगवान गायकवाड, सत्तर पटेल, वारे सर, बाजीराव उन्हाळे, हाबीब भाई, यषपाल लहाने, मोहन चव्हाण, पुरूषोत्तम शेळके, मनोज जाधव, अब्रार बागवान, शैलेद्र वाघ, संजय इंगळे, प्रमोद लहाने, विठल पिवळ, अजाबराव इंगळे, एन.टी.भुसारी, देंवेद्र भुसारी, प्रदिप मोरे, सुरेष गुंजकर, समाधान देषमुख, समाधन गिते, राहुल साखरे, शेकर मगर, राजु सोनुने, प्रमोद सोनुने, पंडीत हिवाळे, पाटीलबा वाघ, शमीम सौदागर, नाजुकराव बापु, सुरज सोनुने, समाधान नेमणार, अमोल वारे, संदिप खोंडे, प्रकाष काळवाघे, अनिल वारे, रमेष पाटील, एकनाथ कोरडे, गणेष भोंडे, राजु जाधव,साहेबराव कानडजे, संजुकाका बाहेकर, सतिष बाहेकर, यांच्यासह विविध सेल व विभागाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते, भागधारक मोठया संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके, व्यवस्थापक संजय चित्ते यांच्यासह संपुर्ण कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

राहुल भाऊंचे नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य: आ. धीरज लिंगाडे

अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २७ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल आणि उत्कृष्ट आर्थिक प्रगतीबद्दल अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी यावेळी विशेष कौतुक केले आहे. बँकेच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करताना त्यांनी, बँकेची १३१ कोटी रुपयांच्या ठेवींची झेप, ९० कोटींचे दर्जेदार कर्जवाटप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘शून्य टक्के एनपीए’  ही अत्यंत उल्लेखनीय बाब असल्याचे सांगितले.
समर्पित कर्मचारी वर्ग, प्रभावी कर्जवसुली आणि कर्जदारांनी पाळलेली आर्थिक शिस्त या त्रिसूत्रीमुळेच हे यश शक्य झाले असून राहुल भाऊ बोंद्रे यांचा शांत स्वभाव, प्रसंगावधान राखून निर्णय घेण्याची क्षमता आणि नेहमीच  जनतेच्या हिताचा विचार करण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद असल्याचेही आमदार लिंगाडे म्हणाले.  सत्ता आपल्या विरोधात असली तरी न्यायव्यवस्था सत्याच्या बाजूने असल्याने राहुल भाऊ बोंद्रे यांनी काँग्रेस पक्षासोबतच राहण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, आगामी काळातील प्रत्येक संघर्षात काँग्रेस कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विदर्भ,खानदेश आणि मराठवाड्यात शाखाविस्ताराची वाट मोकळी : राहुलभाऊ बोंद्रे

सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांना केंद्रस्थानी ठेवून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी उभारलेल्या अनुराधा अर्बन बँकेने आर्थिक वर्षात दमदार कामगिरी नोंदविताना बँकिंग क्षेत्रातील आपली भक्कम वाटचाल कायम ठेवली आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेची उलाढाल सुमारे २५० कोटी रुपये, तर एकूण उत्पन्न १३ कोटी ८१ लाख रुपये झाल्याची माहिती अनुराधा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी 27 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. विशेष म्हणजे, सलग पाचव्या वर्षी शून्य टक्के थकीत अशी ऐतिहासिक कामगिरी बँकेने नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेच्या कामगिरीतील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ECBA (eligible criteria bank authorization)श्रेणीत अनुराधा अर्बन बँकेचा समावेश झाला आहे. बँकेचे कार्यक्षेत्र बुलढाणा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता आता बुलढाण्यासह पाच जिल्ह्यांपर्यंत विस्तारले असून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या तीन विभागांत बँकेच्या विस्ताराचा मार्ग खुला झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ECBA श्रेणीतील पात्रतेमुळे बँकेला शाखाविस्तारासाठी अधिक स्वायत्तता मिळाल्याचे सांगताना बोंद्रे म्हणाले की, बँकेची पहिली विस्तारित शाखा मेहकर येथे सुरू झाली असून जळगाव जामोद मधील शाखेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातही अनुराधा अर्बन बँकेची शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांत बँकेचा विस्तार अधिक वेगाने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुराधा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची संवेदनशीलता
बुलढाणा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर अनुराधा अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांसह इतर सत्कारांना फाटा देण्यात आला. सत्कारासाठी पुष्पगुच्छ, शाल किंवा इतर औपचारिक साहित्याचा वापर न करण्याचा निर्णय
प्रकाश भाऊ मेहत्रे, नाझीमखा हाशमखा , डॉ. पी एस वायाळ, शैलेंद्र भांगडिया, एडवोकेट हर्षवर्धन बोंद्रे, रमेश सोनवणे, स्वाती अमोल लहाने ,प्रमोद महाले, निर्मिती साळुंखे, एडवोकेट वृषाली बोंद्रे, पंढरीनाथ टेकाळे, डॉक्टर मंगेश मिसाळ, , लखन नागवानी, प्रवीण मेंडसे  संचालक मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता जपली. जिल्ह्यातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असताना उत्सवी स्वरूपातील सत्कारांऐवजी त्यांच्या वेदनांची जाणीव ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आला. दुष्काळाच्या संकटाच्या काळात साधेपणाने आमसभा घेण्याचा हा निर्णय उपस्थितांसाठीही विशेष चर्चेचा विषय ठरला✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button