–अशोक भुजंगराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जिल्हा स्तरावर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राहेरी बुद्रुक येथील पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते श्री. अशोक भुजंगराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या बुलढाणा जिल्हा सरचिटणीसपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान केले.
श्री. अशोक देशमुख हे पक्षाच्या स्थापनेपासून अत्यंत एकनिष्ठ राहिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विशेष शिफारसीनुसार श्री. देशमुख यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्री. देशमुख यांचा मतदारसंघातील आणि जिल्ह्यात असणारा जनसंपर्क अत्यंत दांडगा असून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आजवर कार्य केले आहे. त्यांच्या या अनुभवाचा आगामी काळात बुलढाणा जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
आपल्या या नियुक्तीनंतर बोलताना श्री. अशोक देशमुख यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. तसेच, “या पदाचा उपयोग मी केवळ राजकारणासाठी न करता, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करेन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल राजकीय व सामाजिक स्तरातून श्री. अशोक भुजंगराव देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.



