शांतता समितीची बैठक मेडशी पोलीस चौकी येथे संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे.भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेश विसर्जन केले जाते. जेव्हा बाप्पा 10 दिवस लोकांच्या घरी राहतात तेव्हा अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होते.सध्या महाराष्ट्राचा देशभरात गणेश उत्सवाची धूम सुरू असून बऱ्याच ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसात गणपती विसर्जन तसेच ईद चा कार्यक्रम संपन्न होणार असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने मेडशी गावात दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर मेडशी पोलीस चौकीमध्ये सर्व गणेश मंडळाची व ईद उत्सव समितीची संयुक्त शांतता बैठक पार पडली.त्यामध्ये ठाणेदार संजय चौधरी यांनी मंडळातील अध्यक्ष व सदस्यांना गणपती विसर्जन करताना कायद्याच्या चौकटीत राहून आनंद साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी सह पोलीस निरीक्षक गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक मधुकर पेटकर, जमादार राजेंद्र बंगाले,ज्ञानेश्वर सानप, गावातील सरपंच शेख जमीर,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे शौकत पठाण, पोलीस पाटील अनिता चोथमल यांच्यासह गोरखनाथ भागवत,रफिक मिस्त्री,अनिस बागवान,शेख अनिस,विठ्ठल भागवत, प्रशांत मेडशीकर,सर्वेश खंडेलवाल, शंकर डुकरे,सुनील इंगळे,उल्हास घुगे,अभिषेक घुगे,निलेश करवते, आकाश जाधव,अजिंक्य मेडशीकर सह गावातील सर्वच मंडळातील अध्यक्ष सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



