बुलढाणामहाराष्ट्र

अज्ञाताने १७ वर्षीय विद्यार्थीनीलाफुस लावून पळविले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

विदर्भ प्रतिनिधी श्याम पहुरकर

नांदुरा येथील ११ व्या वर्गात

शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीस अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. नांदुरा शहरातील राज नगर भागातील सदर विद्यार्थीनी २७ ऑक्टोंबर रोजी शाळेत जाते असे सांगून घरून गेली. मात्र परत आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती मिळून आली नाही. यामुळे याबाबत तिच्या भावाने नांदुरा पोस्टेला तक्रार दिली असून कुणीतरी अज्ञाताने त्याच्या बहीणीस फुस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञानावर कलम ३६३ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button