बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

आमदार संजय गायकवाडांना नरसिंह अवताराची आठवण, म्हणाले नरडीचा घोट घेऊन त्याला फाडून खाईन..!

आमदार संजय गायकवाडांना नरसिंह अवताराची आठवण, म्हणाले नरडीचा घोट घेऊन त्याला फाडून खाईन..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या बेधडक विधानांनी चर्चेत असतात. विधानांच्या परिणामांचाही ते विचार करीत नाहीत.. आता आज, पुन्हा त्यांचे नवे विधान चर्चेत आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर आडवे येणाऱ्याच्या नरडीचा मी गोड घेईन, त्याला फाडून खाईन असा खळबळ उडून देणारा इशारा त्यांनी दिला. निमित्त होते मोताळ्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या भूमीपूजनाचे, माजी मंत्री एकनाथ खडसे, खा. प्रतापराव जाधव, खा. रक्षा खडसे, माजी खासदार उल्हास पाटील यावेळी मंचावर उपस्थित होते.

मागील काळात मराठा आरक्षणाला द्वेष भावनेतून कडाडून विरोध करणाऱ्यामुळे गोरगरीब मराठा बांधवांचे अपरिमित नुस्कान झाले. मात्र आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर आडवे येणाऱ्याच्या नरडीचा घोट घेईल, त्याला फाडून खाईल असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी बोलतांना दिले.
आज राज्यात जी इंच का आंदोलने होत आहेत याला मराठा तरुणांत निर्माण झालेला असंतोष कारणीभूत आहे. मी याची समर्थ करणार नाही असे सांगून स्वतः जरांगे पाटील यांनी हिंसक आंदोलने न करण्याचे आवाहन केले आहे. गरिबीला जात आहे असे सांगून शेती आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता आरक्षणाच्या आडवे येणाऱ्याच्यी गय करणार नाही असेआमदार गायकवाड म्हणाले…


Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button