बुलढाणामहाराष्ट्र

शेगावात मध्ये ‘हात से हात जोडो’ अभियानशहरातून निघाली रॅली शेगाव

शेगावात मध्ये ‘हात से हात जोडो’ अभियानशहरातून निघाली रॅली शेगाव

: (प्रतिनिधी) आज शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हात से हात जोडो’ अभियान राबवण्यात आले.शहरातील माहेश्वरी भवनातून रॅलीची सुरुवात होऊन जनतेमध्ये जनजागृती करण्याकरिता काँग्रेस पक्षाची पत्रके वाटण्यात आली. केंद्र सरकार अदाणी-अंबानी व धनदांडग्यांच्या मागे कसे आहे त्याचा परामर्श या रॅलीत घेण्यात आला. भारत जोडो यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसने ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू केले असून बुलढाणा जिल्ह्यातील संत नागरी शेगावातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा समन्वयक शामभाऊ उमाळकर, कॉन्ग्रेस पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले, पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपर्क रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हि रॅली श्री अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लहुजी वास्ताद चौक शिवनेरी चौक, आठवडीबाजार मार्गे बसस्थानकासमोरून या रॅलीचा समारोप माहेश्वरी भवनात करण्यात आला. या रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष शिवाजी बुरुंगले शैलेंद्र पाटील, विजय काटोले, गोपाल कलोरे, बुडन जमादार, दयाराम वानखडे, जुबेर सहारा, सय्यद हाशम, प्रफुल्ल ठाकरे, किरण देशमुख, निकुंज देशमुख, अविनाश आकोटकार, केशवराव हिंगणे, जब्बार ठेकेदार, संतोष माने, शेख चांद, फिरोज खान, लक्ष्मण गवई , सुनीताताई कलोरे, सौ राजवैद्य, धामंधे मॅडम, विजय ढ,गे महेश देशमुख, आबिद शाह यांच्यासह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button