महाराष्ट्र

अकोला हादरलं! ‘बिंदी घर’ की वासनेचा अड्डा? महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या नराधमांचा पर्दाफाश

प्रतिनिधी

. राजेंद्र मुंढे अकोला शहरात संताप उसळवणारा आणि अंगावर शहारे आणणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील ‘बिंदी घर’ नावाच्या कॉस्मेटिक दुकानात महिलांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल व छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीतून उघडकीस आला आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, खरेदीच्या बहाण्याने महिलांना दुकानात बोलावले जात होते. त्यानंतर त्यांच्यावर मानसिक दबाव टाकून, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू होते. महिलांच्या असहायतेचा फायदा घेत अत्याचार केला जात असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. हा प्रकार समोर येताच अकोल्यात एकच खळबळ उडाली असून, “हे दुकान आहे की वासनेचा अड्डा?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठमोठ्या घोषणा करणारे प्रशासन या घटनेवर गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. II.COM महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक संघटनांनी दिला आहे. अकोला शहरात महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, हे प्रशासनाने आता कृतीतून सिद्ध करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button