अकोलाबुलढाणामहाराष्ट्र

अकोला एल.सी.बी. पथकाची धडक कारवाई! पो. स्टे. तेल्हारा ह‌द्दीतील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणारा व मोबाईल क्र. बंद ठेवणारा किर्तनकार आरोपी अखेर तेल्हारा पोलीसांच्या ताब्यात! विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी अकोला.

दि.२९ जुलै २०२५ | पोलीस स्टेशन तेल्हारा ह‌द्दीतील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणाऱ्या किर्तनकार आरोपीस एल.सी.बी. अकोला चे पथकाने राजणंगाव, पुणे येथुन केली अटक केली आहे. शनिवार दि . १९/०७/२०२५ रोजी पो.स्टे. तेल्हारा येथील दाखल अपराध क. २१३/२०२५ कलम १३७ (२) भा.न्या.सं. मधील अपहृत मुलीला गावाकडील युवकाने फुस लावुन पळवुन नेली असावी अशा शक्यतेने तपास केला असता काही मिळुन येत नव्हते. तेव्हा अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीत असलेल्या पिडीतीच्या आई वडीलांनी परिसरातील प्रतिष्ठीत नागरिका मार्फत मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सा. यांना मुलीचा शोध घेण्याची विनंती केली असता मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी एल.सी.बी. चे प्रमुख श्री. शंकर शेळके यांना पथक नेमुन समांतर तपास करून मुलीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाच्या पथकाने पिडीत मुलीचे नातेवाईक, गावातील लोक यांना विचारपुस केली असता असे लक्षात आले कि, ०४ महिन्यापुर्वी गावातील वारकरी सप्ताह निमित्त आरोपी नामे प्रदिप दामोदार लासुरकार वय २५ वर्ष रा. तळेगाव वडनेर, ता. तेल्हारा जि. अकोला हा सप्ताहमध्ये किर्तन व पखवाज वाजविण्यासाठी आला होता, तेव्हा त्याची अपहृत मुलीसोबत ओळख झाली होती. गोपनिय माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी प्रदिप दामोदर लासुरकार यानेच मुलीला पळवुन नेल्याचे निश्पन्न झाले परंतु त्यांनी त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला होता. एल.सी.बी. च्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी यास रांजणगांव एम.आय.डी.सी., पुणे येथील एका फ्लॅट मधुन अटक करून अपहृत मुलीची सुटका केली. पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीस पो.स्टे. तेल्हारा, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा, जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी सा, जि अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील पो.उप.नि. गोपाल जाधव, पो. अमंलदार सुलतान पठाण, राज चंदेल, सतिश पवार, राहुल गायकवाड मनिष ठाकरे तसेच सायबर शाखेचे पो. अं. गोपाल ठोंबरे यांनी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button