रमजान महिन्यात बाजारात कोट्यवधींची उलाढाल……

(जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)शहरातील मस्तान चौकामध्ये झालेली गर्दारमजान महिन्यात खामगाव शहरातील बाजारात गर्दी वाढली असून, कोट्यवधींची उलाढाल होत आहे.रमजान महिन्यात शहरातील मस्तान चौकात लाखो रुपये किमतीच्या खजुरांची विक्री होत आहे. खजूर खरेदीवर अधिक भर देण्यात येत आहे. सध्या बाजारात १०० ते १२०० रुपये किलोपर्यंत खजूर विकले जात आहेत. खजुराशिवाय फळांचीही मुबलक विक्री होत आहे. फळामध्ये आंबा, टरबूज, काकडी, पपई, खरबूज, संत्री, सफरचंद आदींची विक्री होत आहे. तळलेल्या पदार्थांमध्ये पापड, भजे, मूग डाळ, वडा आणि सामोसे विकले जात आहेत. मस्तान चौकात विकल्या जाणाऱ्या खजुरांपैकी किमिया खजूर ३०० रुपये किलो, बॉम किमिया खजूर २८० रुपये, भरारी खजूर ४०० रुपये, हेलोना खजूर २४० रुपये, साधा खजूरविविध प्रकारचे खजुरांची मागणी वाढली आहे.खजूर ४०० रुपये, कलमी खजूर ८०० रुपये किलोने विकले जात आहेत. अशाप्रकारे रमजान महिन्यात खजुरांची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.विविध प्रकारच्या शरबतांना मोठी मागणी असते. तसेच, रमजानच्या महिन्यात शहरातील सर्व दुकानांमध्ये खजूर, शरबत, सुकामेवा आणि विविध प्रकारच्या शरबतांचा व्यवसायही वाढला आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांपासून बाजारातील गर्दी ओसरली होती. यंदासुद्धा महागाईमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र, मुस्लिम समाजाचा पवित्र महिना ……✍️



