टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली तेल्हारा नगरी

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता.प्रतिनिधी विजय घोडे ✍️तेल्हारा येथे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने शहरात दिनांक 30/03/23 गुरुवारला सकाळी दहा वाजताच्या सुमारास भव्य मोटार सायकल रॅली काढून भगवा ध्वज तसेच भगव्या पताका लावत रस्त्याने श्रीराम चंद्राचा जयघोष ,फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच सायंकाळी टाळ मृदंगाच्या गजरात विविध दिखाव्याणीशी शोभायात्रा काढण्यात आली त्यामध्ये अवघी तेल्हारा नगरी दुमदुमली होती. शहरामध्ये श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी निमित्त विविध देखाव्यानी सजलेली शोभायात्रा काढण्यात आली त्यामध्ये श्री राम लक्ष्मण सीता सहित श्रीराम भक्त हनुमान व त्यांची वानर सेना असा मनमोहनीय देखावा सादर करण्यात आला होता त्यामध्ये विविध कलाकारांनी भाग घेतला तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती या शोभा यात्रेमध्ये आर्टिस्ट गणेशराव खराटे यांच्या हस्तकलेतून साकारण्यात आली होती हा नजारा पाहण्याकरिता असंख्य भाविकांची गर्दी जमली होती तसेच शोभायात्रेमध्ये श्रीराम यांचे भाऊ लक्ष्मण यांना शक्तिबान लागलेला मूर्छित अवस्थेतील देखावाही या ठिकाणी सादर करण्यात आला होता, अगदी हुबेहूब प्रतिकृती सादर करण्यात आली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधीस्त प्रतिमा स्थापित देखावाही सादर करण्यात आला होता एकता मंडळतील युवकांनी तोफीचा देखावा सादर केला होता अश्वरूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ साहेब यांचाही या शोभा यात्रेमध्ये देखावा सादर करण्यात आला होता मनब्दा-भांबेरी येथील महिला मंडळाने लाठी-काठी च्या माध्यमातून मुलींनी विविध अवगत कला सादर केल्या त्यावेळी त्यांचे प्रशिक्षक ही शोभायात्रेमध्ये उपस्थित होते ही शोभायात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी मनात्री येथील टाळकरी, मृदंग वादक, गायक आणि त्यांचा समूह यांनी त्यांच्या कलेतून विविध भावगीते ,भक्ती गीते गाऊन भाविकांना मोहित केले.ही शोभायात्रा शहरातील सेठ बन्सीधर मैदान येथून प्रारंभ होऊन मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली पुढे समितीच्या सदस्यांनी टॉवर चौक ,पोलीस स्टेशन ,संताजी चौक तसेच जुने शहर इत्यादी विविध प्रभागांमध्ये जाऊन भाविकांना या शोभायात्रेचे दर्शन घडवले .अशाप्रकारे पायदळ,तसेच विविध ट्रॅक्टर मध्ये विविध देखावे सादर केले असून कोणताही अनिष्ट प्रकार घडू नये म्हणून असंख्य पोलिसांच्या निगराणीत यावर्षी चा श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव आनंदाने मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये तेल्हारा पोलीस स्टेशनचे ज्ञानोबा फड साहेब यांच्या आखत्यारीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या शोभायात्रेत अनेक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावर्षीचा श्रीराम नवमी शोभायात्रेचा उत्सव यशस्वी होण्याकरिता समितीच्या सदस्यांनी कमालीची कसरत केली याची प्रशंसा सर्वत्र होत आहे



