केजरीवालांना मोठा झटका! ‘दिल्ली सेवा विधेयक’

*केजरीवालांना मोठा झटका! ‘दिल्ली सेवा विधेयक’ राज्यसभेतही मंजूर*विरोधकांच्या प्रचंड गोंधळानंतर ‘दिल्ली सेवा विधेयक’ सोमवारी राज्यसभेतही मंजूर झालं. या विधेयकाच्या बाजूनं १३१ तर विरोधात १०२ मतं पडली. त्यानंतर हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली.यावेळी सत्ताधारी खासदारांकडून ‘मोदी-मोदी’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.राष्ट्रपतींकडं सहीसाठी जाणारलोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळं ते आता राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यावर सही केल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष कायद्यात रुपांतर होईल. विरोधकांचा प्रचंड गोंधळदरम्यान, राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरु असताना आम आदमी पार्टीच्या खासदारांसह इतर विरोधक खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. हे विधेयक बेकायदा असल्याचं ते वारंवार सांगत होते. तसेच पंतप्रधान मोदी हे सुप्रीम कोर्टाचं देखील ऐकत नाहीत, असा आरोप यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सभागृहात केला. अमित शहांचा ‘आप’वर हल्लाबोलयावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी आपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी



