Uncategorized

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अंदोलन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 15/07 /2024 पासून एम पी आर न देणे, मासिक सभा व शासकीय बैठकामध्ये असहकार्य, आंदोलन व जिल्हा परिषदेवर जेलभरो, साखळी उपोषण, अशा अनेक मागण्या व धरणे आंदोलनाबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती वाशीम यांच्याकडून बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय वाशिम, पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद वाशिम, या कार्यालयामार्फत मा.मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, तसेच मा. प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, तथा मा. आयुक्त एबाविसे योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती वाशिम यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये एम ए पाटील सर, दिलीप उटाणे, सुमा शमीम, भगवान देशमुख, जयश्री पाटील, सविता इंगळे जिल्हा अध्यक्ष वाशिम दिगंबर अंभोरे कार्याध्यक्ष
मालती ताई राठोड जिल्हा सचिव व इतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button