डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयामध्ये, डॉ. गोपाळराव खेडकर यांची १२३ वी जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
तेल्हारा/गाडेगांव दि.१४ ; तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालयामध्ये स्व.डॉ. गोपाळराव उपाख्य आबासाहेब बाजीराव खेडकर माजी ग्राम विकास मंत्री , महाराष्ट्र राज्य, यांची १२३ वी जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख प्राचार्य डॉ गोपाल ढोले यांची उपस्थिती लाभली ,प्राचार्य सरांनी डॉ गोपाळराव खेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करून स्व.डॉ.गोपाळराव खेडकर यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला तसेच डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व डॉ गोपाळराव खेडकर यांचा स्नेह संबंध उलगडून दाखवला तसेच महाविद्यालय निर्मिती मध्ये स्व.डॉ गोपाळराव खेडकर यांची भूमिका विशद केली .याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चे केंद्र संयोजक प्रा. सुरेश झामरे, YCMOU चे बहिःस्थ पर्यवेक्षक प्रा. सुधीर लोखंडे, अनंत सोनमाळे, प्रा. डॉ. मिसाळ ,नौशाद सर, प्रा. संघपाल खंडेराव, सचिन ढोले, किशोर भाऊ, व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते✍️



