विद्यार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे- प्रा. पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी
श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात पी.एम. उषा अंतर्गत व आय. क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शासकीय-अशासकीय योजनांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नाहाटा महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व एन.सी.सी. ऑफिसर दीपक एन. पाटील उपस्थित होते. तर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रा. पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय योजनांची सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात देशभरातील या एन.जी.ओ. यांच्या विशेष योजनांची मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्याचबरोबर आजच्या तरुण पिढीने विविध योजना आत्मसात करून जीवन स्वावलंबी बनवावे असा मौलिक सल्ला ही दिला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी विद्यार्थ्यांनी डोळसपणे राहून देशभरातील विविध शासकीय अशासकीय योजनांचा अभ्यास करून आपले जीवन सुजलाम-सुफलाम बनवावे अशी आशा व्यक्त केली.
महाविद्यालयातील पी.एम. उषा चे समन्वयक तथा उपप्राचार्य अनिल पाटील यांनी पी.एम. उषा या संकल्पनेचे ध्येय आणि उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागृत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रा. शेख यांनी केले तर सूत्रसंचालन या कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक विजय डांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. सुरेखा चाटे यांनी आभार प्रदर्शन केले. तर फोटोग्राफीचे कार्य प्रणव पवार या एनएसएस स्वयंसेवकाने केले.



