अपघातमहाराष्ट्र

जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी | २४ ऑक्टोबर २०२४

रस्तयाच्या परिस्थतीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोर चालणाऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील धर्मेंद्र रामदयाल सोनी (वय ४२, रा. शिवराम नगर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १८ रोजी काशिनाथ हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम नगरात धर्मेंद्र सोनी हे वास्तव्यास असून ते व्यापारी आहेत. दि. १८ रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास (एमएच १९, डीजी ८८८०) क्रमांकाच्या दुचाकीने सुरभी लॉन्स येथे फाईल देण्यासाठी पुतण्याला घेवून जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच १५, एफव्ही ४९५४) क्रमांकाच्या डंपरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात धर्मेंद सोनी हे गंभीर जखमी होवून त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. दरम्यान, धडक दिल्यानंतर डंपर चालक तेथून पसार झाला. उपचार घेतल्यानंतर सोनी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरुन डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button