बुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ

पिक विमा प्रश्नावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे कृषी कार्यालयात आंदोलन.

पिक विमा प्रश्नावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे कृषी कार्यालयात आंदोलन.

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस प्रतिनिधी मिलिंद चराटे शेगा

.शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या विमा कंपनीवर कारवाई करा व शेतकऱ्यांना १०० % विमा रक्कम वितरीत करा अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी यावेळी केली आहे..पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम तुटपुंजी मिळत असल्याने शेतकरी आक्रमक..स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांनी आज ८ डिसेंबर रोजी जळगाव जामोद तालुका कृषी कार्यालयावर धडक दिली आहे. यावर्षी अतीवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोडकी भरपाई देउन कंपनीने चेष्टा चालु केली आहे. याचाच आक्रोश करीत शेतकऱ्यांनी कृषी कार्यालया समोर प्रचंड घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना १००% पिक विमा मिळालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे..यावेळी तालुका उपाध्यक्ष विलास इंगळे, तालुका अध्यक्ष अंकित दाभाडे अकरम दौला धनंजय कोरडे, शरद देवळे, सदानंद माजरे,सुनील जाधव, शेख शाहीद, विष्णू कुकडे, समाधान धुर्डे, विजय मानकर, कपिल वायझोडे, बाबुराव कुकडे, माणिकराव वरणकर, संघपाल गवई, रमेश गवई, दीपक दलाल, दिनकर कपले, गणेश गटमने, सुरेश थोटे, गणेश वाघ, संतोष वाघ, निनाजी सपकाळ, श्याम वाघ, प्रदीप परस्कार, कैलास झाल्टे, जगदेव जाधव, प्रकाश जाधव, अनिल वानखडे, विष्णू वाकोडे, अंकुश सुलताने, श्रीकृष्ण बोरोकार, सय्यद हकीमुद्दीन, विशाल गावंडे, प्रमोद वाघ, अनंता पान्हेरकर, ऋषिकेश सुलताने, सय्यद अदनान यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button