जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भोंनगाव येथे एक लाख तीस हजाराची घरफोडी

भोंनगाव येथे एक लाख तीस हजाराची घरफोडी

स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी मिलिंद चराटे

शेगाव -तालुक्यातील भोंनगाव येथे एक लाख तीस हजाराची घरफोडी उघडकीस आली असून चोरट्यांनी पोलीससन्ना आव्हान दिले आहे भोंनगाव येथील प्रमोद भोनाजी पाचपोहे वय वर्ष 42 यांच्या घराचे लोखंडी चैनल गेट उघडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला व घरातील लोखंडी पेटीतील सोन्याची पोत, कर्नफुले,सोन्याची गहू पोत, कानातील झुमके, सोन्याची अंगठी, तसेच पंधरा हजार लोक रक्कम असा एकूण एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला ही घटना उघडकीस आल्यानंतर एकाच खळबळ उडाली आहे या घटनेने भोंनगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याबाबत प्रमोद पाचपोहे तक्रारी विरुद्ध कलम ४५७…३८० भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button