
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
चिखली : नियंत्रण सुटलेल्या भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात बेराळा येथील राजेंद्र देविदास सुरडकर वय ( ३७ ) रा. बेराळा ह. मु. चिखली यांचा मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना १५ फेब्रुवारी सकाळी ६ वाजे दरम्यान चिखली ते देऊळगाव राजा महामार्गावरील मेरा चौकी ते असोला दरम्यान घडली,
मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र सुरडकर हे तीन मित्रासह, गाडी नंबर ( MH 23 AS 6106 ) या डिझायर कार मधून प्रवास करत होते.
दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली . या अपघातात राजेंद्र सुरडकर यांना गंभीर दुखापत झाली, तर कार मधील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत, अपघातानंतर राजेंद्र सुरडकर यांना तातडीने चिखली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.



