बुलढाणा जिल्ह्यातील टाकळी वाघजाळ येथे युवा शेतकऱ्याचीआत्महत्या….!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर.( रतन भगत.) दि.११/३/२०२६. बुलढाणा:-सविस्तर वृत्त असे की, मोताळा तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथील युवा शेतकरी अंकुश प्रल्हाद हरमकार वय वर्ष 29 यांनी कर्जबाजारीपणा व दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे घटना आज दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बळीराम खंडागळे, शेख इसाक यांनी घटनास्थळी जाऊन पंचायत समक्ष पंचनामा केला. सदर मृतदेह सवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण वाघाझड परिसरात हळूहळू होत आहे. उत्पादन खर्च जास्त आणि शेतीमालाला भाव नाही त्यामुळे सदर शेतकरी अत्यंत हालाखीचे जीवन जगत होता. सदर शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे आणि उत्पादन खर्चाच्या बाबतीत पीक कमी आल्यामुळे नराश्यापोटी सदर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे व्यक्त केल्या जात आहे. पुढील तपास बोराफडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे….



