महाराष्ट्र

गव्हाण येथे ७ लाखाचा मुद्देमाल लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव । तालुक्यातील गव्हाण येथे सोमवार १५ मे रोजी रात्री घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजाचा कडी – कोंडा तोडून चोरट्यांनी घराच्या कपाटातील रोख रकमेसह ६ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

या घटनेसंदर्भात फिर्यादी नितेश पुंडलिक कंकाळे, वय ४३ रा. गव्हाण, ता. शेगाव यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून त्यानुसार काल सोमवार १५ मे

रोजी फिर्यादी व त्याचे कुटुंबीय घराच्या समोरच्या खोलीत झोपले असता अज्ञात चोरट्याने घराच्या भिंतीवरून उडी मारून मागच्या बाजूला असलेल्या किचनच्या दरवाज्याचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात लॉकर व सुटकेस मध्ये ठेवलेली रोख रक्कम ३ लाख ९५ हजार रूपये व २ लाख ९५ हजार रूपयांचे सोन्याचे निरनिराळे दागिने असा एकूण ६ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केल असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगांवकर हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button