बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

जनुना येथे बुद्धविहारात ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ ग्रंथाचे वाचन

खामगाव (प्रतिनिधी जी.डी. रोकडे) –
जनुना (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथील बुद्धविहारात बौद्धाचार्य शुद्धोधन दुर्योधन शेजव (रा. जनुना) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन संपन्न झाले. या वेळी परिसरातील अनेक उपासक-उपासिका व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धम्मवाचन प्रसंगी विशाखेची दानशूरता व पुण्यपरमिता, तसेच पंचशील पालनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात पंचशील किडा मंडळ व माता रमाई महिला मंडळ, जनुना यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित उपासक-उपासिकांनी श्रवण करून पुण्य संपादन केले.

🔸 सामाजिक कार्याची प्रेरणा

शुद्धोधन शेजव हे मागील दहा वर्षांपासून वर्षावासाच्या काळात सायकलवरून खामगाव तालुक्यातील खेड्यापाड्यांना भेटी देऊन धम्मप्रचार व धम्मग्रंथ वाचनाचे कार्य निस्वार्थपणे करत आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी आपला स्वखर्च करून गावातील गोरगरीब व गरजू मुलांना शालेय साहित्य – पेन्सिल, रबर, पेन, वह्या आदींचे वाटप केले आहे.

याशिवाय, ते गेल्या एक वर्षांपासून दररोज संध्याकाळी सहा वाजता मुलांना मोफत शिक्षण देण्याचे कार्यही सतत करीत आहेत. या कार्यात त्यांना शेख राजिक सर यांची साथ लाभली आहे.

🔸 धम्मविचारांचा प्रसार

ग्रंथवाचन, दानपरमिता व मोफत शिक्षण यांसारख्या उपक्रमातून समता, शिक्षण आणि करुणा या बुद्धधर्माच्या मूल्यांचा जनतेत प्रसार करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button