वन बुलढाणा मिशनचा संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद शुभारंभ! संदीप शेळके म्हणाले, मागासलेला जिल्हा ही ओळख पुसून काढणार;

वन बुलढाणा मिशनचा संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद शुभारंभ! संदीप शेळके म्हणाले, मागासलेला जिल्हा ही ओळख पुसून काढणार;
एवढी उपलब्ध असताना जिल्हा मागासलेला कसा असू शकतो…
स्टार एक लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
बुलढाण्याचा मागासलेला जिल्हा म्हणून उल्लेख केला जातो. त्यावेळी मनाला प्रचंड वेदना होतात. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास साधून मागासलेला जिल्हा ही ओळख कायमची पुसून काढणार, असा निर्धार राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केला.
वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा संकल्पने अंतर्गत १७ सप्टेंबर रोजी चिखली तालुक्यातील इसोली येथून संध्याकाळी संवाद यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्यात गुणवंतांची कमी नाही. तरीही तरुणांना रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, सुरत, आमदाबाद, दिल्ली, बंगळूर सारख्या महानगरात जावे लागते. शेतीसाठी मुबलक सिंचन व्यवस्था नाही. रस्ते ,पाणी, हाय काका वीज आधी सुविधांची वानवा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षणाची दालन कमी पडत आहेत. दर्जेदार क्रीडांगणे. क्रीडा सुविधा. आरोग्य सुविधा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला पंचक्राशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी गावातून पायदळ रॅली काढण्यात आली . रॅलीत महिला ,पुरुष, युवक -युवती, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. महामानवांच्या पुतळ्यास हार अर्पण करून संदीप शेळके यांनी अभिवादन केले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. ग्रामस्थांनी सत्कार केला. संवाद यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. आपला बुलढाणा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. शेगावचे संत गजानन महाराज यांच्या रूपाने आध्यात्मिक वारसा लाभला आहे. लोणार येथील खाऱ्या पाण्याचे जागतिक सर्व सर आपल्याच जिल्ह्यात आहे. विठ्ठल भक्त संत चोखामेळा हे आपल्या जिल्ह्याच्या मातीतील आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून जिल्हा परिषद आहे. एवढ्या सर्व उपलब्ध असताना जिल्हा मागासलेला कसा असू शकतो? असा सवाल संदीप शेळके यांनी उपस्थित केला.



