बुलढाणामहाराष्ट्रराजकीय

शासनाने होमगार्डची वयोमर्यादा उठवली! ५० लाखांची विमा संरक्षण व लाखांपर्यंत शैक्षणिक सुविधा; आ. श्वेता ताई महालेंच्या कपात सूचनेला देवेंद्र फडवणीस यांचे लेखी उत्तर

शासनाने होमगार्डची वयोमर्यादा उठवली! ५० लाखांची विमा संरक्षण व लाखांपर्यंत शैक्षणिक सुविधा; आ. श्वेता ताई महालेंच्या कपात सूचनेला देवेंद्र फडवणीस यांचे लेखी उत्तर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी

उषा इंगळे

बुलढाणा सनवार असो की सामाजिक तणावाचे वातावरण, निवडणूक असो की नैसर्गिक आपत्ती, प्रत्येक ठिकाणी मदत कार्य आणि फायदा व सुव्यवस्थाबंदोबस्तासाठी निस्वार्थ हेतूने व स्वयं स्फूर्तीने उपस्थित राहणाऱ्या होमगार्डचे मोठे सामाजिक योगदान आहे. मात्र अनेक वर्षापासून त्यांचे काही प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आ. सीता ताई महाले यांनी विधानस भेमध्ये या संदर्भातील कपात सूचना महाविकास आघाडीची शासन असताना मांडली होती. त्यांच्या या सूचनेची दखल तत्कालीन कोणत्याही गृहमंत्र्यांनी घेतली नाही. परंतु उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कार्यवाही करून होमगार्डस साठी पूर्वीच्या सरकारने लावलेली ५० वर्षाची वयोमर्यादा उठवली. याशिवाय आता राज्यातील होमगार्डचा ५० लाखापर्यंतचा अपघात विमा राज्य सरकार मोफत उतरवणार आहे. त्यांच्या पाल्यांना चार लाख रुपया पर्यंतच्या शैक्षणिक सुविधा तसेच इतर अनेक लाभ देखील मिळणार श्वेता ताई महाले यांच्या प्रयत्नातून राज्यातील समस्त होमगार्डसना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यातील लक्षावधी होमगार्डच्या हिताचा विचार करून आ. श्वेता ताई महाले यांनी २०२१ मध्ये विधानसभेच्या तिसऱ्या अधिवेशनात २८१८ क्रमांकांची कपातीची सूचना मांडली होती. या अंतर्गत ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिला व पुरुष होमगार्ड सना शासनाकडून बंदोबस्तावर तैनात करण्याची जी बंदी घालण्यात आली होती ती उठवण्याची मागणी केली होती. याशिवाय गृहरक्षक दलातील जवानांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुषंगिक सेवांचे लाभ देण्याची मागणी आ. महाले यांनी आपल्या कपात सूचनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली होती. या दोन्ही विषयांचे गांभीर्य ना. देवेंद्र फडवणीस यांनी लक्षात घेऊन त्यावर येशोचीत कारवाई श्वेता ताई महाले यांनी उपस्थित केलेल्या हरकतीच्या सूचने संदर्भात ना. देवेंद्र फडवणीस यांनी आ. माले यांना पत्र पाठवून स्पष्टीकरण केली आहे.करोना काळामध्ये ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना कोबीची लागण होण्याची शक्यता अधिक होती; त्यामुळे त्यांच्या जीवित्वास देखील धोका निर्माण होण्याची भीती होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ५०ते५८ वर्षे वयोगटातील होमगार्ड बंदोबस्तावर तैनात न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, करुणाची लाट ओसरल्यानंतर आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने आताही बंदी उठवण्यात येत असून ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्या होमगार्डनी करोनाप्रतिबंधक दोन लस्सी घेतले आहेत, अशा होमगार्डाना देखील बंदोबस्तावर तैनात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी आ. यांना प त्राद्वारे केली. आहे. होमगार्ड कर्तव्यावर असताना जखमी अथवा मृत्युमुखी पडल्यास होमगार्डला किंवा त्यांच्या वारसांना महाराष्ट्र होमगार्ड कल्याण व लोकहीतेशी निधीतून अर्थसहाय्य करण्याची प्रचलित नियमात तरतूद आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्षाप्रमाणे अनुषंगिक सवलतींचा लाभ देण्याबाबतची तरतूद शासन नियमात उपलब्ध नाही. परंतु, राज्यातील होमगार्डच्या कल्याणाच्या अनुषंगाने एचडीएफसी बँकेची करार करण्यात आला. त्यानुसार होमगार्ड सना महासमादेशक कार्यालयाच्या २८ जून २०२२ च्या आदेशाने अनेक महत्त्वाच्या सोयी, सुविधा देण्यात आल्याचे ना. फडणवीस यांनी श्वेता ताई महाले यांना पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात म्हटले आहे. त्यानुसार आता राज्यातील अनेक होमगार्डचा विनामूल्य वैयक्तिक अपघात विमा ५० लाख रुपये, विनामूल्य स्थायी अपघाती विकलांग ताई विमा१० लाखापर्यंत, विनामूल्य स्थायी अंशिक अपघाती विकलांगता विमा ५० लाखापर्यंत ,विनामूल्य स्थायी अंशिक अपघाती विमा ५० लाखापर्यंत, विनामूल्य शैक्षणिक लाभ ४ लाखापर्यंत खातेदारकांच्या अवलंबित असलेल्या पाल्यांना (मृत्यु प्रकरणी), रुग्णालयात दाखल झाल्यावर १५ दिवसांपर्यंत दररोज एक हजार रुपये याप्रमाणे विनामूल्य लाभ देण्यात येईल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button