महाराष्ट्रविदर्भ

गौलखेड येथे चोरी५ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव | तालुक्यातील गौलखेड येथे चोरट्यांनी चोरी केली असुन घरातुन सोने चांदीच्या दागिन्यासह ५ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल ११ मे रोजी पहाटेदरम्यान उघडकीस आली.

आनंदा रामचंद्र शेजोळे (६०) रा. गौलखेड यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीमध्ये अशा आशयाचे नमुद करण्यात आले आहे की, आनंदा शेजोळे हे १० मे रोजी घरी कुटूंबासोबत झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरात प्रवेश करून दोन लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेले सोन्याच्या साखळ्या, दोन गोफ, चपला हार, पट्टापोथ, २ नेकलेस असा एकुण ५ लाख ७६ हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले. ही घटना १० मे च्या रात्री ११ वाजता ते ११ मे च्या पहाटे ५ वाजता दरम्यान घडली. आनंदा शेजोळे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोनि दिलीप वडगावकर करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button