मुक्ताईनगर शहरांमध्ये आरटीओ ची कुठल्याही प्रकारची कारवाई का नाही ? काय गुपित ?

मुक्ताईनगर शहरांमध्ये दुचाकीचे हिरो चे शोरूम असून या ठिकाणी कुठलिही आरटीओ विभागाकडून विक्रीचा परवाना नसताना देखील बिनधास्तपणे मुक्ताईनगरच्या शोरूम मधून दुचाकी विक्री होत आहे यामध्ये आरटीओ चा नियम देखील धाब्यावर ठेवून दुचाकी विक्री होत आहे कुठलेही वाहन विक्री करण्या पूर्वी पासिंग करून द्यायला हवी असा RTO विभागाचाच नियम असून देखील त्या नियमाचे सुद्धा तीन तेरा व नऊ अठरा करण्याचा प्रकार मुक्ताईनगर शहरात व जिल्ह्यात पहायला मिळत आहे याला जबाबदार कोण? RTO विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे RTO विभागा च्या संगन मताने तर हा प्रकार सुरु नसेल न असा हि प्रश्न नागरिकांमध्ये उपस्तित केला जात आहे
RTO विभाग कडून डीलर लोकांना नोटीसा दिल्याची चर्चा आहे थातूर मातुर कारवाई च देखावा केला जात आहे पण कुंपण च शेण खाण्याचा प्रकार परंतु सब डीलर चे काय ज्यांना परवानाच नाही दुचाकी विक्रीचा तेच सब डीलर हजारोच्या संख्येने दुचाकी विक्री करत आहे प्रशासनाचा नियम देखील धाब्यावर ठेवत आहे याला जबाबदार कोण
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची सीमा मुक्ताईनगरच्या हाकेच्या अंतरावर असल्या कारणाने आरटीओ विभागाचे अधिकारी मुक्ताईनगर शहरात येत असतात तरीदेखील मुक्ताईनगर शहरांमध्ये अधिकाऱ्यांसमवेत फिरत असताना देखील त्यांना विनापरवाना असलेल्या शोरूम बाबत कल्पना नसेल का कि मांजर दूध पिण्याचा प्रकार होत आहे



