Uncategorized

अंगणवाडी मदतनीस यांचे दोन दिवसिय प्रशिक्षण शिबिर संपन्न

मलकापूर प्रतिनिधी :- २६/११२०२४ रोजी स्त्रियांसाठी पोषण आहार संदर्भात मार्गदर्शन तसेच गर्भधारणे विषयी आवश्यक असणारे महत्त्वाचे पोषण तत्व आणि गरोदरपणाच्या वेळी महिलांनी बाळाच्या विकासा साठी घ्यावयाची काळजी आणि सकस आहार घेण्या संदर्भात मुख्य स्रोत हिरवा भाजीपाला मटण,चिकन, मासे, गोड मका, खारीक, तीळ, नाचणी, वटाणे, आणि हिरवा भाजीपाला पोषण आहार महिलांनी गर्भधारणे विषय घ्यावयाची काळजी मुळे जन्माला आलेल्या बाळाला स्तनपानाचे फायदे आईचे पहिले दूध या दुधामुळे बाळाची रोग प्रतिकार क्षमता वाढते म्हणजे बाळाची पहिले लसीकरण असते तसेच इतर विषयावर सविस्तर असे प्रतिपादन एकात्मिक बाल विकास प्रकल्प मलकापूर यांच्यावतीने अंगणवाडी मदतनीस यांच्या २५/११/२०२४ ते २६/११/२०२४ या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर हे मलकापूर येथील भीमनगर मधील त्रिरत्न बुद्ध विहाराच्या सभागृहामध्ये घेण्यात आले व प्रशिक्षणचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैशाली वैराळकर यावेळी उपस्थित होत्या व त्यांनी पोषण आहार संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले . त्यावेळी विचार मंचावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प च्या मुख्य सेविका सी. एन. पाचपोळ व सोहेल शेख यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. व २६/११/२०२४ रोजी संविधान दिन असल्यामुळे प्रशिक्षण
ठिकाणी सर्वप्रथम भारतीय संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात येऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
त्यावेळी उपस्थित अंगणवाडी मदतनीस ज्योती दांडगे, अनिता वानखेडे, गुंजन अवसरमोल, सुनिता चव्हाण, सुनिता तळेकर, आफिया जरीन , फलकनाज, कौशल भिडे, रेखा सातव, अरुणा सातव, निलोफर फातिमा, रुखसार शेख निसार, दुर्गा चोपडे, शहाणा, आधी मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button