*हिवरखेड येथील सोनवाडी फाटा परिसरात स्व. ज्ञानदेवरावजी गिऱ्हे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोईं सुरु!, ४४° सेल्सिअस तापमानात नागरिकांची भागत आहे तृष्णा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी
विजय घोडे
हिवरखेड (रूप);
हिवरखेड येथील सोनवाडी फाटा परिसरात प्रवासी वर्ग, विद्यार्थी, महिला, शेतकरी बांधव, मजूर वर्ग, विविध वाहन चालक इत्यादींची दिवसभरात हजारोंच्या संख्येने वर्दळ असते. परंतु तेथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात नागरिक तहानेने व्याकुळ होत होते. हजारो नागरिकांची ही व्यथा गिऱ्हे कुटुंबीयांच्या नजरेतून सुटली नाही. गिऱ्हे कुटुंबीयांना लोकनेते ज्ञानदेवरावजी गिऱ्हे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे. जनता त्यांना आदरस्थान मानायची.
माजी जिल्हा परिषद सभापती ज्ञानदेवजी गिऱ्हे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण गिऱ्हे कुटुंबीयांकडून नागरिकांच्या तृष्णा तृप्तीसाठी थंडगार शुद्ध पाण्याची व्यवस्था हिवरखेड येथील सोनवाडी फाटा परिसरात करण्यात आली. शिक्षक विजय खिरोडकार यांच्या हस्ते सदर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गणेश कुऱ्हाडे, दीपक दांडगे, संजय गिऱ्हे, निखिल गिऱ्हे , विशाल गिऱ्हे , शिक्षक उमेश तिडके, गजानन बंड, रफिक भाई, गणेश भड, यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मनोगत व्यक्त करताना संजय गिऱ्हे यांनी सांगितले की स्व. ज्ञानदेवरावजी गिऱ्हे यांचे संपूर्ण आयुष्य जनसेवेत गेले. लोकांच्या अडी-अडचणी , समस्या सोडविण्यातचं ते त्यांचे सौख्य मानायचे. त्यांच्या समाजकार्याचा वारसा आम्हाला लाभला असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्याअभावी व्याकुळ नागरिकांना पाहून पानपोई सुरू करण्याचा निर्णय आमच्या कुटुंबीयांनी घेतला. आणि तात्काळ पाणी सुरू करण्यात आली. हल्ली प्रखर उन्हाळा सुरू असून या पानपोईमुळे ४४° सेल्सिअस तापमानात अनेक नागरिकांची तृष्णा भागत आहे.



