अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

Modified केलेल्या वाहनांचा मिरवणूक किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वापर करता येणार नाही!

आदेशाची प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे यंत्रणांना पत्र!

विजय मनोहरराव घोडे आवाज न्यायाचा, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी
अकोला

मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर यांचेकडील मूळ जनहित याचिका क्र. 90/2025 मध्ये दिनांक 11.09.2026 रोजी आदेश पारित करण्यात आला असून, त्यानुषंगाने दिनांक 16.09.2026 रोजी मा. न्यायालयाने ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्याबाबत आवश्यक निर्देश दिलेले आहेत:

आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालयाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले असून, सदर निर्देशांचा कालावधी दिनांक 11.09.2026 पासून दिनांक 01.11.2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत असा आहे;

आणि ज्याअर्थी, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणुका तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये Dolby/DJ Sound, Top-Mid-Bass स्वरूपाच्या बहुविध ध्वनिक्षेपक यंत्रणा, Plasma Sound, Pressure-Mid Sound इत्यादींचा वापर करण्यात येण्याची शक्यता असून, सदर ध्वनिक्षेपक यंत्रणा मोठ्या प्रमाणावर व थरावर थर रचून वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास येते; आणि अशा ध्वनिक्षेपक यंत्रणांमुळे निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी निर्माण होऊन पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे;
सदर प्रकारच्या अतितीव्र ध्वनीमुळे नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता व सार्वजनिक शांततेवर प्रतिकूल परिणाम होण्याची तसेच नागरिकांच्या तक्रारी, वादविवाद व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही;

मिरवणुकीमध्ये मोठ्या क्षमतेच्या ध्वनिक्षेपक यंत्रणा वाहून नेण्यासाठी अथवा बसविण्यासाठी वाहनांमध्ये अनधिकृत अथवा नियमबाह्य स्वरूपाचे बदल (Modify) करण्यात येण्याची शक्यता असून, अशा वाहनांचा वापर केल्यामुळे सार्वजनिक रस्ते, वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता व सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. नमूद परिस्थितीचा विचार करता, सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक व इष्ट आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये, सार्वजनिक उपद्रव अभया संभाव्य धोका टाळण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्याचे अधिकार सक्षम दंडाधिकाऱ्यास प्राप्त आहेत.

प्रतिक्रिया –
मी, वर्षा मीना, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, अकोला, मी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त असल्याने अधिकारांचा वापर करून, मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीत नागपूर यांचे दिनांक 11.09.2026 व दिनांक 16.09.2026 रोजीचे निर्देश विचारात घेऊन, अकोला जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात दिनांक 11.09.2026 पासून दिनांक 01.11.2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत, खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे .

आदेश –
अकोला जिल्ह्यातील कोणत्याही आगमन, विसर्जन अथवा इतर सार्वजनिक मिरवणुकीमध्ये Dolby/DJ Sound, Top-Mid-Bass स्वरूपाची बहुविध ध्वनिक्षेपक यंत्रणा, Plasma Sound, Pressure-Mid Sound अथवा तत्सम अतितीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या ध्वनियंत्रणांचा वापर करता येणार नाही.
वरीलप्रमाणे ध्वनियंत्रणा बसविण्यासाठी अथवा वाहून नेण्यासाठी अनधिकृत/नियमबाह्य पद्धतीने Modified केलेल्या वाहनांचा मिरवणूक किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वापर करता येणार नाही.
कोणतीही व्यक्ती, संस्था, मंडळ, मिरवणूक आयोजक, ध्वनियंत्रणा मालक, चालक, ऑपरेटर किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजक यांनी वरीलप्रमाणे प्रतिबंधित कृत्ये करू नयेत. तथापि, लागू असलेल्या कायदे, नियम, सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानग्या व ध्वनी मर्यादांच्या अधीन राहून परवानगीयोग्य ध्वनिव्यवस्थेचा वापर असल्यास, त्यावर संबंधित कायदे व नियमांनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लागू कायदे व नियमांनुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. हा आदेश मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक 11.09.2026 पासून दिनांक 01.11.2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंतच्या निर्देशित कालावधीच्या अनुषंगाने जारी करण्यात येत असून, आदेशाची अंमलबजावणी/प्रसिद्धी झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना त्याची माहिती देऊन काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यात यावे. पोलीस अधीक्षक, अकोला तसेच सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार व संबंधित पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदर आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.

वर्षा मीना, भा.प्र.से जिल्हा दंडाधिकारी, अकोला यांचे विविध यंत्रणांना पत्र!

पोलीस अधीक्षक, अकोला यांना सदर आदेशाची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी.

सर्व संबंधित पोलीस अधिकारी/पोलीस ठाणे प्रभारी यांना आवश्यक सूचना देऊन प्रत्यक्ष तपासणी व उल्लंघन झाल्यास कायदेशीर कार्यवाही करणे.

सर्व उपविभागीय अधिकारी, अकोला जिल्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात आदेशाची प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी.

सर्व तहसीलदार, अकोला जिल्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात आवश्यक प्रसिद्धी करून संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून कार्यवाही करण्यासाठी.

आयुक्त, अकोला महानगरपालिका / मुख्याधिकारी, संबंधित नगरपालिका/नगरपंचायत कार्यक्षेत्रात सदर आदेशाची प्रसिद्धी करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी.

जिल्हा माहिती अधिकारी, अकोला यांना सदर अधिसूचनेची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी पत्र देण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button