सामाजिक

तेल्हारा येथे ८ वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा कवी संमेलनाने समारोप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि २६ ; तेल्हारा येथील भागवत मंगल कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई व शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा रविवार दि २५ फेब्रुवारीला सायंकाळी कवी संमेलनाने समारोप झाला.
संमेलनाच्या प्रथम सत्रात म्हणजे दि.२४ फेब्रुवारी रोजी तेल्हारा शहरामध्ये विविध प्रसिद्ध ग्रंथांची ग्रंथदिंडी काढण्यात आली, या दिंडीमध्ये भारताचे संविधान, ग्रामगीता , लीळा चरित्र , स्मृतीगंध आदी ग्रंथांचा समावेश होता, शहरातील महापुरुषांच्या स्मारकाला हार अर्पण करून मानवंदना दिली व दिंडीचे भागवत मंगल कार्यालयाकडे प्रस्थाण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने केली. यावेळी आमदार सुधाकरराव अडबोले नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ यांची विशेष उपस्थिती होती . प्रा.डॉ. सदानंद देशमुख बारोमासकर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष अरविंद गिऱ्हे होते . द्वितीय सत्रात मंचावरील कार्यक्रमात उद्घाटन समारंभ , शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी , ‘शिक्षक मत’ या विशेषांकाचे प्रकाशन तसेच मालती ताई देशमुख गोंडचर यांचा ‘अप्रूप’ काव्यसंग्रह , जया सु. देशमुख यांचा ‘व्यासंग’ काव्यसंग्रह प्रा. डॉ. अनघा सोमवंशी सोनखासकर यांचा ‘अनुग्रह’ चारोळी संग्रह , राजेंद्र भटकर यांचा ‘जातीचे मढं जावो’ चारोळी संग्रह , जयदीप सोनखासकर यांचा ‘आयुष्य पेलताना’ कविता संग्रह, प्रतिभा शिरभाते यांचा ‘कटू सत्य’ वैचारिक लेखसंग्रह , सुनीता बकाल तळोकार यांचा ‘संगिनी’ काव्यसंग्रह इत्यादी संग्रहांचे प्रकाशन आणि गुणवंतांचा सत्कार , उद्घाटकाचे मनोगत व अध्यक्षीय भाषण आदी बाबींचा समावेश होता.
निसर्गवासी भाई प्रभाकरराव सावरकर साहित्य नगरीमधील आयोजित संमेलनामध्ये तिसऱ्या सत्रात आयोजित परिसंवाद कार्यक्रमामध्ये एकविसाव्या शतकातील ‘जागतिक भविष्यवेधी, शिक्षण’ या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. ज्ञानेश्वर
हंडरगुळीकर होते तर विशेष सहभाग म्हणून पाटणा बिहार येथून शिक्षण तज्ञ सौ. कांचन पांडेय मॅडम उपस्थित होत्या. दोघांनीही अतिशय उत्कृष्टपणे २१ व्या शतकातील भविष्यवेधी शिक्षण या विषयावर अतिशय विस्तृतपणे, अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले. या कार्यक्रमाचे अतिशय बहारदार व रंगतदार संचालन श्री. श्याम पाठक सर, जि.प.शाळा मनब्दा, यांनी केले. कार्यक्रमाला अनेक लोकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमातून निश्चितच सर्व शिक्षक व शिक्षण प्रेमींना फायदा होणार आहे असे मत मान्यवरांनी या परिसंवाद कार्यक्रमातुन व्यक्त केले.
चौथ्या सत्रामध्ये कथाकथन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाचव्या सत्रामध्ये भूमिकन्या डॉ. प्रतिभा इंगोले जेष्ठ साहित्यिका यांची मुलाखत व गायन कट्ट्याचा समावेश होता. सहाव्या सत्रामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते ,या संमेलनात अध्यक्ष स्थानी लोककवी विठ्ठल वाघ असून प्राध्यापक कौलखेड सर यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी बांधकाम क्षेत्रात गवंडी काम करणारे गजानन यादगिरे यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कवितेला संमेलनात उपस्थित मान्यवरांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करुन दाद दिली.
तर दुसऱ्या दिवशी रविवार दि.२५.फेब्रुवारीला संमेलनाच्या सातव्या सत्रात भूमिपुत्र , लोककवी विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत होती.
आठव्या सत्रामध्ये ‘गझल , मुशायरा’ संमेलनात सादर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील चंद्रशेखर भुयार होते. यावेळी अजीत सपकाळ, अमोल सिरसाठ, अरविंद उन्हाळे , किशोर बुजाडे, गोपाल डॉ. लक्ष्मण उगले, नाना लोडम, चित्रा कहाते नीलेश कवडे प्रियंका गिरी , संदीप वाकोडे, अमोल गोंडचर, अश्विनी बोंडे, डिगांबर खडसे आदींनी गझलकार यांनी आपल्या उत्कृष्ट गझली व मुशायऱ्यांचे सादरीकरण केले.
नवव्या सत्रात मुक्त संवाद कार्यक्रमामध्ये ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या विषयावर आधारित मुक्त संवादाचे आयोजन केले होते यामध्ये सुचिता पाटेकर प्राथ. शिक्षणाधिकारी जि. प. अकोला यांची उत्कृष्ट मुलाखत शिवराज जामोदे यांनी घेतली यावेळी मान्यवरांचे आभार सुनिता गिऱ्हे यांनी मानले.
याच सत्रातील कवी संमेलनामध्ये अध्यक्षस्थान बुलढाणा येथील प्रा. गोविंद गायकी यांनी भूषविले असुन विलास ठोसर, रवी सोनवणे, माधव वाघमारे, प्रा. रवींद्र साळवे, सतीश जामोदकर, कुलदीप बदर, शशिकांत हिंगणीकर, कैलास पवार, मालती देशमुख, सुरेश चिमणकर, छाया पात्रे, सुशीला मळसने, संजीवनी काळे, राजेंद्र भटकर, सुनीता कोरडे, प्रकाश अंधारे, प्रदीप राऊत, देवीदास वाघ, थोरात, सुनीता बकाल, उमा गवई, सुनीता काकड, साहेबराव बंबल, राजेश्वर बुंदिले, सविता राऊत, आचल सरदार, हेमलता नेमाडे, मोतीराम पहुरकर, किशोर पात्रीकर, डॉ. भुलबुले, विनोद सोनी, स्नेह गावंडे, कुशल राऊत, सोपान कुकडे, आदींनी कवी प्रेमींकरिता अतिशय सुंदर , नवनवीन , मनमोहक कविता सादर केल्या . तर दहाव्या आणि शेवटच्या सत्रात समारोप समारंभ , खुले अधिवेशन , ‘जीवन गौरव पुरस्कार’ चे वितरण व मान्यवरांचा सत्कार आदींचा समावेश होता. या संमेलनामध्ये नितेश पवाने यांची नाणे प्रदर्शनी हे विशेष आकर्षण ठरले .
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष प्राचार्य अरविंद गिऱ्हे , समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष दै. लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरणजी अग्रवाल हे असुन यावेळी कॅप्टन सुनील डोबाळे, आयोजक जयदीप सोनखासकर, बोलीभाषा अभ्यासक डॉ. रावसाहेब काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन चारुदत्त मेहेरे ,श्याम पाठक, स्वप्नाली कराळे, सचिन ठोंबरे ,राजेश सातव, सतीश दराडे , रवींद्र वर्गे, गोपाल सुरे यांनी केले. तर आभार संघर्ष सावरकर यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button