खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला आमदार श्वेता महाले पाटील यांची विकासाची नवी दिशा..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

धाड मंडळामध्ये 1.83 कोटी रु च्या रस्त्याचे भूमिपूजन..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करून गावागावातील विकासाला गती देण्याचा जो व्यापक दृष्टिकोन स्वीकारला आहे, त्याच धोरणाला अनुसरून चिखली विधानसभा मतदारसंघात आमदार श्वेता महाले पाटील सातत्याने विकासकामे मार्गी लावत आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, बुलढाणा अंतर्गत रा.मा. ७५३ एम ते बोरखेड रस्ता (व्हीआर-५८) (एलआर-१८) या सुमारे १ कोटी ८३ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ग्रामीण रस्त्यांचे सशक्त जाळे उभारण्यावर विशेष भर दिला जात असून, त्याच विकासदृष्टीची प्रभावी अंमलबजावणी चिखली मतदारसंघात आमदार श्वेता महाले पाटील करत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांप्रमाणेच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून त्यातूनच या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

या रस्त्याच्या निर्मितीमुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुकर दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वाहतूक सुलभ झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच विकासाच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत.

यावेळी आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, “मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी गती मिळत असून, जनतेने दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर विकासाची ही वाट अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

या भूमिपूजन सोहळ्यास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button