बुलढाणामहाराष्ट्र

सरकारने भाऊसाहेबांच्या सोबत शेतकऱ्यांचा सन्मान —

सरकारने भाऊसाहेबांच्या सोबत शेतकऱ्यांचा सन्मान केला — आ अँड आकाश फुंडकर; बुलढाणा नवीन कृषी महाविद्यालयाला स्व भाऊसाहेब फुंडकर यांचं नाव
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे।
खामगाव ::- बुलढाणा येथे नव्याने सुरू होत असलेल्या कृषी महाविद्यालयाला लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर नाव देवून राज्य सरकारने भाऊसाहेबांचाच नव्हे तर शेतकऱ्यांचा सन्मान केला असल्याची प्रतिक्रिया आ अँड आकाश फुंडकरांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख व्ययवसाय हा शेती आहे. लोकांच्या उपजीविकेचे प्रामुख्याने
शेती व जंगल यावर आधारित आहे. सद्यस्थितीत बुलढाणा जिल्ह्यात एकही शासकीय कृषि महाविद्यालय कार्यरत नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासकीय कृषि महाविद्यालय स्थापन झाल्यास सद्या प्रचलित असलेला चार वर्षाचा कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी परिसरात कृषी तज्ज्ञ म्हणून काम करतील. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेती उत्पन्न वाढविण्यासाठी मोठी मदत होईल. तसेच जिल्ह्यात कृषी उद्योग सुद्धा वाढतील. 2016 – 17 च्या भाजप सरकारने हा निर्णय घेतला होता. अखेर आता भाजप महायुती सरकारने याला पूर्णतः मान्यता दिली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे संलग्नित बुलढाणा येथे नवीन कृषी महाविद्याल होत आहे. या महाविद्यालयासाठी लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांनी खूप प्रयत्न केले. ते कृषी मंत्री असताना यासाठी त्यांनी सर्व बाबींची पूर्तता केली होती. त्यांचे अकाली निधन झाले नसते तर हे महाविद्यालय केव्हाच सुरू झाले असते. आघाडी सरकारने हे महाविद्यालय होऊ दिले नाही. परंतु आता शेतकरी हिताचे सरकार येताच भाऊसाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आणि सरकारने या महाविद्यालयाला भाऊसाहेबांचे नाव देण्याचा निर्णय घेतला . भाऊसाहेबांनी आपलं अख्ख आयुष्य शेतकरी हितासाठी समर्पित केलं. त्यांचं राजकारण शेतकरी बांधवांच्या न्यायासाठीच होत. ते स्वतः कोरडवाहू शेतकरी असल्याने त्यांना शेतकरी प्रश्नांची खरी जाणीव होती. त्यांचे समस्या सरकार व शासनाकडून सोडवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख होती. कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे सरकारने शेतकरी नेते सोबत एका शेतकऱ्याच भाऊसाहेब फुंडकर नाव देवून त्यांचाच नव्हे तर समस्त शेतकऱ्यांचा सन्मान सरकारने केला आहे . यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button