Uncategorized

बुलढाणा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटीचे प्रस्तुत हिंदी भक्तिगीत ‘श्री कृष्णाय नमो नमः’ प्रचंड प्रचलित

मलकापूर प्रतिनिधी (शेख निसार) – बुलढाणा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटीने हिंदी भक्तिगीत ‘श्री कृष्णाय नमो नमः’याची निर्मिती केली आहे. या म्युसिक व्हिडिओ मध्ये मराठीचे सुपरस्टार “भूषण प्रधान” यांनी श्रीकृष्णाची मुख्य भूमिका साकारली आहे. या संगीतमय व्हिडिओचे शूटिंग सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथे करण्यात आले असून, आ. राधेशामजी चांडक ( भाईजी ), डॉ. सुकेशजी झंवर, आणि आ. कोमलताई झंवर यांच्या सोबत सहकार विद्या मंदिर मधील 100 विद्यार्थी आणि शहरातील 200 हुन अधिक लोकांनी या शूटिंग प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.
या भक्तिगीताचे निर्माते श्री. राधेशामजी चांडक ( भाईजी) स्थानिक गायक आणि संगीतकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी आणि हिंदू धर्म संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. ‘श्री कृष्णाय नमो नमः’ हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या गाण्याने अवघ्या एका दिवसात ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.
भूषण प्रधान यांच्या साकारलेल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या भक्तिगीताने भक्तिरसात न्हाललेले रसिक मन जिंकले आहे. सहकार विद्या मंदिरच्या परिसरात या संगीतमय व्हिडिओचे शूटिंग करण्यात आले होते आणि संपूर्ण गावातून लोकांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला होता.
श्री. राधेशामजी चांडक ( भाईजी )यांचे हे पाऊल नक्कीच स्थानिक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या भक्तिगीताच्या यशामुळे या सोसायटीची भक्तिगीत निर्मिती क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button