बेराळा फाट्यावर भीषण अपघात, एसटी बसने दुचाकी ला उडवले. पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
चिखली : तालुक्यातील बेराळा फाट्यावर आज दि.२३ फेब्रुवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला , जांभोरा येथे जाणाऱ्या केळवद येथील दांपत्याच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली . या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
संजय पांडुरंग गायकवाड ( वय ५८ ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून पत्नी शीला गायकवाड या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार संभाजीनगर वरून हिंगणघाटकडे जाणारी बस चिखलीकडे येत होती. त्याचवेळी केळवद येथील संजय गायकवाड हे पत्नीसह दुचाकीने रस्ता ओलांडत असताना येवत्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी येणाऱ्या भारधाव बसने दुचाकीला उडविले , या अपघातात संजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



